अजित पवार यांना रोकठोक बोलण्यासाठी ओळखलं जात पण त्यांची हीच भूमिका त्यांना कधी-कधी अडचणीत आणते बारामतीत बोलत असताना अजित पवार यांनी एक किस्सा सांगितलं आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते.असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते बारामतीच्या निरावागज येथील सभेत बोलत होते.
यावर सुप्रिया सुळे, यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या अजित दादांनी असे केले असेल तर ते चुकीचे आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनीही अजित पवार यांच्या या वक्तव्यावर टीका केली. विरोधक राज्यातली वाढती गुन्हेगारी वरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार राजीनामा मागत आहे. आणि आता अजित पवार यांच्या या वक्तव्याने गृहखातं पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अजित पवार म्हणाले, अहिल्याबाईंनी चांगल काम केलं,कारभार चांगला केला, त्यामुळे अहमदनगर जिल्हा तालुका नाव बदललं आणि अहिल्यानगर नाव दिलं.आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत,दुष्काळ पडला आहे. अनेक विकास कामे सुरू आहेत. कुठल्या कामाला पैसे मिळाले नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर पैसे देण्यात येतील. गाय दूध दर वाढ राज्य सरकार देत आहे,दुधात मिक्सिंग दुधात करू नका,असाला पैसा टिकत नसतो,भेसळ युक्त घालू नका, असंही आवाहनही अजित पवार यांनी केलं.