मावळ विधानसभा मतदारसंघात सुमारे ७२.१० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून रात्री उशिरा माहिती प्राप्त झाली. मतदानाची अंतिम आकडेवारी आज (गुरुवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असे अधिकारी म्हणाले. यावेळची मतदानाची टक्केवारी मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षीपेक्षा ३०,४६९ जादा मतदान झाल्यामुळे या विक्रमी मतदानाचा कोणाला फायदा होणार, कोणाला फटका बसणार याविषयी राजकीय गणिते मांडली जाऊ लागली आहेत.
बुधवारी सकाळी ७ ते दुपारी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
एकूण मतदारसंख्या :- ३,८६,१७२
पुरुष :- १४४०१६
स्त्री :- १३४४१४
इतर :-०२
झालेले एकूण मतदान :-२,७८,४३२
टक्केवारी :- ७२.१०%
मावळ विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २,९२,६१५ होती. त्यापैकी २,०८,०९५ मतदारांनी मतदान केले, म्हणजेच त्यावर्षी ७१.१२ टक्के मतदान झाले होते.
मावळ विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ३,४८,४६२ होती. त्यापैकी २,४७,९६३ मतदारांनी मतदान केले, म्हणजेच त्यावर्षी ७१.१६ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदान प्रथमच ७२ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा ३०,४६९ पेक्षा जास्त मतदारांनी यावेळी मतदान केले आहे. हे मतदान कोणाच्या बाजूने जाणार याविषयी तालुक्यात उत्सुकता आहे. मतदानानंतर महायुतीचे उमेदवार सुनील शेळके व प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे या दोघांनीही विजयी होण्याचा दावा केला आहे.
मागील तीन निवडणुकांमध्ये कोणाला किती मते मिळाली होती?
मावळ विधानसभा निवडणूक २००९
बाळा भेगडे (भाजप) – ८३,१५८ मते (मताधिक्य १४,३१८)
बापूसाहेब भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ६८,८४० मते
रमेश साळवे (आरपीआय – ए) -१५,१६० मते
मावळ विधानसभा निवडणूक २०१४
बाळा भेगडे (भाजप) ९५, ३१९ मते (मताधिक्य २८,००१)
माऊली दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस) ६७,३१८ मते
किरण गायकवाड (काँग्रेस) १७,६२४ मते
मावळ विधानसभा निवडणूक २०१९
सुनील शंकरराव शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस) – १,६७,७१२ मते (६७.५८%) (मताधिक्य ९३,९४२)
बाळा भेगडे (भाजप) – ७३,७७० मते (२९.७३%)
रमेश (वंचित बहुजन आघाडी) – २,७२८ मते
मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये १९७८ पासून काँग्रेस चार वेळा, भाजप तीन वेळा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकदा जिंकला आहे.