भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ( दि.२७ मे) मोसमी पावसाचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यांनी अगोदरचा जून ते सप्टेंबर, या पावसाळ्याच्या काळात देशभरात सरासरीपेक्षा जास्त १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, नियोजित वेळेत केरळमध्ये दाखल होईल. जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतात दमदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. जून महिन्या सह जून ते सप्टेंबर, या काळात राज्यात सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच राज्यात जोरदार पाऊस सुरू होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे.
पुढील पाच दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होईल. जून महिन्यात ईशान्य भारतात कमी पावसाची शक्यता असून, सरासरी ९४ टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल. उत्तर भारतात ९२ ते १०८ टक्के. महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त ९४ ते १०६ टक्के आणि दक्षिण भारतात ९४ ते १०६ टक्के पेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदाच्या जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.