वाकड: भाऊसाहेब हरी दगडे (वय ३७, रा. मल्हार कॉलनी, रहाटणी फाटा, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कि, दि. १२ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास थेरगाव येथील दिप्ती मेडिकल व पाकिजा बेकरीच्या मध्ये फुटपाथवर
भररस्त्यात येणार्या जाणार्यांना दोन तरुण कटरचा धाक दाखवुन मारहाण करत होते त्या तरुणांना असे करु नका, लोक घाबरतात, असे सांगितल्याच्या रागातून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून दगडे यांच्या गळ्यावर कटरने वार करुन त्या दोघांनी दगडेंना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
भाऊसाहेब दगडे यांच्या तक्रारी नुसार पोलिसांनी दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनगरबाबा मंदिराकडून फुटपाथवरुन घरी जात होते. पाकिजा बेकरी ते दिप्ती मेडिकलच्या मध्ये असलेल्या जागेत फुटपाथवर दोन २० – २२ वर्षाची मुले येणार्या जाणार्या लोकांना त्यांच्या हातात असलेल्या कटरचा धाक दाखवून मारहाण करत होते. तसेच बाजूला असलेल्या सलून दुकानदाराला शिवीगाळ करुन दुकान बंद करण्यास सांगत होते. त्यावेळी फिर्यादी हे तेथे जाऊन त्यांना असे करु नका, लोक घाबरतात, असे बोलले. त्यावर त्यांच्यातील एक जण ‘‘ तु कुठला भाई आहेस, आम्ही इथले भाई आहेत, तुला माहिती नाही काय, मी कोणाचा माणूस आहे. मी रविमल मामाचा भाचा आहे. तू येथून निघून जा नाही तर तुझी विकेट टाकू’’असे बोलून त्याने फिर्यादीस हाताने मारहाण केली. दुसर्याने हातातील कटर फिर्यादीच्या गळ्यावर मारुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या बाबत वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एन एम सूर्यवंशी तपास करीत आहेत.