वाहन चोरी करणाऱ्या इसमाला देहूरोड पोलिसांनी अटक करत ३ गुन्हे उघडकीस आणले आहे
वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. रवींद्र सुरेश सातोळे (वय १९, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
२९ मार्च रोजी देहूरोड मधील स्वामी चौक येथील ब्रिज खालून एक दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी दुचाकी मालक चंद्रकांत तलारी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यातील आरोपीचा शोध घेत असताना देहूरोड पोलिस तपस पथकातील पोलीस अंमलदार मोहसीन अत्तर व शुभम बावनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाजवळ येणार आहे.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रवींद्र सुरेश सातोळे (वय १९, रा.पाण्याच्या टाकी जवळ, गांधीनगर, देहूरोड) याला ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटारसायकल व त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली, त्याच्याकडे सखोल व कसून तपस केला असता त्याने देहूरोड पो. स्टे. गुरनं. १६६/२०२४ भा.दं.वी. कलम ३७९, देहूरोड पो. स्टे. गुरनं. १७६/२०२४ भा.दं.वी. कलम ३७९ व पिंपरी पो. स्टे. गुरनं. १३७/२०२४ भा.दं.वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे.
आरोपी रवींद्र सातोळे त्याच्याकडून एकूण १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या एकूण चार मोटर सायकल हस्तगत करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे देहूरोड पोलीस स्टेशनचे तीन व वाकड पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश प्राप्त झाला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग घेवारे यांच्या आदेशोस्तव वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहूरोड विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड, पोलीस आमदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे, सागर पंडित यांनी केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.