हिंदूत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक आणि मोशी प्राधिकरण येथील संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज शिवाजी पवार यांची नुकतीच पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी निवड झाली आहे.
पवार हे मोशी प्राधिकरणातील स्वामी समर्थ मंदिरांचे संस्थापक म्हणून सर्वाना परीचित आहे.
हिंदू राष्ट्रीय सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदुतेज सूर्य श्री धनंजयभाई देसाई यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर संघटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते पंकज शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडो पदाधिकारी व हिंदू राष्ट्रवीर उपस्थित होते भविष्य काळामध्ये हिंदू साठी व हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचं प्रयत्न युवा नेते पवार यांनी करावा व ते करतील अशा देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
पवार यांच्या माध्यमातून वर्षभर अनेक धार्मिक सण व कार्यक्रम साजरे केले जातात. यामुळे त्यांच्या निवडीचे परिसरातून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.