पिंपरी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हॉकर्स झोनच्या निर्मितीसाठी संघटना प्रयत्नशील राहिल. पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांसह शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू. हॉकर्स झोन निर्मितीसाठी आमच्या संघटनेच्या आठ उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यावसायिकांना केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहर पथक विक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. यामध्ये टपरी, पथारी, हातगाडी पंचायत तसेच कष्टकरी कामगार पंचायत च्या वतीने आठ उमेदवारांचे पॅनेल उभे केले आहेत. पिंपरी येथे या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. या वेळी नारळ चिन्हासमोर सिक्का मारून उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. तसेच भोसरी येथे निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित व्यावसायिक, संघटनेचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पतविक्रेता फेरीवाला समितीचे उमेदवार १)बळीराम काकडे, २) दामोदर मांजरे, ३) आशा कांबळे, ४) रमेश शिंदे, ५) शुभांगी मोरे, ६) ममता मानुरकर, ७) कलीम शेख उर्फ मलिक, ८) वासंती जाधव हे उमेदवार उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले की, विरोधी गटाच्या दहा संघटना एकत्र येऊन त्यांना आठ उमेदवार देखील मिळाले नाही. आमच्या सर्व आठ उमेदवारांचा चिन्ह आहे नारळ नारळ चिन्ह समोर सिक्का मारून आमच्या पॅनेलला प्रचंड बहुमताने विजयी करा. टपरी, पथारी, हातगाडी पंचायत या संघटनेचे आठ उमेदवार उभे आहेत. आमच्या विरोधात असणाऱ्या दहा संघटना एकत्र आल्या आहेत. परंतु दहा संघटना एकत्र येऊनही त्यांना आठ उमेदवार देता दमछाक होत आहे. या निवडणुकीमध्ये आपलाच विजय होणार आहे. सर्वांनी जोरदार प्रचार करा आणि आपले सर्व आठ उमेदवार बहुमताने निवडून आणा, असे आवाहन टपरी, पथारी, हातगाडी पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
भोसरी येथे दामोदर मांजरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन बाबा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी पंचायत उपाध्यक्ष अनिल गाडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अमरजीत सिंग पोथीवाल, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष, इस्माईल बागवान,सचिव शिवाजी कडूक, उपाध्यक्ष फिरोज तांबोळी, प्रवक्ते अविनाश जोगदंड, मधुराताई डांगे, कल्पना गाडगे, दत्तात्रय जाधव, आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले