पुणे । प्रतिनिधी
मुंबई, दि.२२ : मुंबई महापालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल. यासंदर्भातील अधिकृत माहिती ईडी अधिकारीच देऊ शकतील. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ईडीने मुंबईत छापेमारी केल्याने त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी लोहगाव विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या छापेमारीबाबत भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, ईडीने नेमकी काय
कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण मुंबई महापालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करताना कोणताही अनुभव नसताना अशा कंपन्या तयार झाल्या.
त्यांनी लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळ – केला. यामध्ये पुण्यात एका पत्रकाराचा मृत्यूही झाला आहे. कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आल्याने त्यातून अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू
शकेल. मला माहिती नाही. पण ज्यांचे या प्रकरणात कनेक्शन आहे, त्यांच्यावर ईडी कारवाई करेल. याचा तपशील ईडीच्याच अधिकाऱ्यांकडे आहे, असेही फडणवीस म्हणाले.
कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या १५ ठिकाणींवर छापेमारी केली आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे.












