पुणे, दि. १८ : रेकॉर्डवरील जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सहा तासात अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी आदित्य विजय शिंदे ( वय-२१ वर्षे, रा-करपे वाडा, सोमवारपेठ, पुणे ), गणेश चंद्रकांत कवडे ( वय-१९ वर्षे रा-सदानंदनगर, तिसरा मजला, फ्लॅट नं-३२५, मंगळवार पेठ, पुणे ) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ रोजी सौ. सोनाली प्रशांत काकडे ( वय-३० वर्षे, व्यवसाय- नर्स, रा-दुसरा मजला, इंदीरा कॉम्प्लेक्स, सदानंदनगर, मंगळवारपेठ पुणे ) यांनी फिर्याद दिली की, मनपा बस स्टँड येथुन पुणे स्टेशनकडे जाणारी बस पकडण्यासाठी पायी जात असताना पाठीमागुन स्कूटरवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या हातातील काळी पर्स बळजबरीने हिसकावुन चोरी करून नेली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपास घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मनपा येथे महिलेला लुटणारे अनोळखी इसम हे जुनी कामगार पुतळा वसाहत, शिवाजीनगर येथे आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आरोपी हा एका अनोळखी इसमासह टीव्हीएस गाडीसह थांबलेला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला जागीच पकडले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केले. तसेच त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली स्कुटर ही सुध्दा जप्त करुन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी विरोधात , भा. द. वि. कलम ३९२. ३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
सदर दाखल गुन्हयातील नमुद अनोळखी इसमांचा तपास चालू असताना शिवाजीनगर पोलिसानी ह्या गुन्हयाचा कौशल्यपर्ण तपास करुन गुन्हा दाखल झाल्यापासून सहा तासाच्या आत आरोपी पकडुन त्यांना गुन्हयात अटक केली व गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मुद्देमाल व वापरलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे. हे आरोपी हे रेकॉर्डवरील असल्याने अशाच प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच नमुद गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. सचिन तरडे हे करीत आहेत,












