पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने शनिवार, २३ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास वर्गामध्ये ‘महत्वाच्या संविधानिक संस्था : निवडणूक आयोग आणि राज्यपाल’ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे मार्गदर्शन करणार आहेत.
हा अभ्यासवर्ग २३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता गांधी भवन,कोथरूड, पुणे येथे होईल. अभ्यास वर्ग सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव आणि युवक क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बर्वे यांनी केले आहे.












