‘काऊडिग्नीटी’ तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कौतुकाची थाप
आजच्या पिढीने ज्येष्ठांकडून परमार्थाचे संस्कार आत्मसात करणे काळाची गरज आहे. जरी तुम्ही व्यस्त असले तरी इतरांसाठी वेळ काढा; तोच वेळ भविष्यात तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरेल. सत्कारणी लावलेला वेळ हा तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आजारापासून दूर ठेवेल. असे प्रतिपादन श्रीमहंत श्रीकांतदास धुमाळ गुरुजी महाराज यांनी केले.
काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ गोसेवक सूर्या पुजारी यांच्या परिश्रमातून पुण्यात राबविण्यात आलेल्या “कॅन्सल द कॅन्सर” या तीन दिवशीय उपक्रमाचा समारोप राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्याने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमहंत श्रीकांतदास धुमाळ गुरुजी बोलत होते. पुरस्कारामध्ये कृषिरत्न, उद्योगरत्न, समाजरत्न, आदर्श माता, पत्रकार आदी विवीध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संस्था, NGO अश्या एकूण ४० मानकरींना यंदाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पॉवर ट्रेनर श्री दत्ता कोहिनकर, व्यावसायिक मार्गदर्शक एस. एस. सावंत, चित्रपट निर्माते शांताराम भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कांबळे आदी मान्यवरांसह पुरस्कारार्थी व पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक सूर्या पुजारी म्हणाले, ‘कॅन्सल द कॅन्सर’ उपक्रम जन हिताचा आहे. यामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता असून आपण देखील यामध्ये सहभागी व्हावे करतो. आजचा हा दिवस समारोपाचा नसून येणाऱ्या नवीन वर्षात पुणे शहर आणि राज्यभरात ‘कॅन्सल द कॅन्सर’ चे रोड शो आयोजित करण्यात येतील. यामध्ये कर्करोग तपासणी मोफत करून जर उपचार करण्याची गरज पडली तर त्या साठी देखील संस्था मदत करेल अशी घोषणा पुजारी यांनी केली.
माईंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिंकर म्हणाले, मित्रांच्या कामाचे कौतुक करणे याशिवाय उत्तम कार्य होऊ शकत नाही. आज फॅमिली कोर्टातील ९०% केसेस बघितल्या तर एकमेकांचे कौतुक न केल्यामुळे इथपर्यंत आलेल्या पाहायला मिळतात. वयाच्या 75 मध्ये सूर्या पुजारी यांचे काम पाहून मी भारावून गेलो. मासाहेब जिजाऊ यांच्या कौतुकाने स्वराज्याला सुभेदार तानाजी मालुसरे दिले तसेच आजचा हा पुरस्कार तुम्हाला पद्मश्री पर्यंत पोचवेल असा शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन करतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी केले तर आभार प्रणव थोरात यांनी मानले.












