शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेलं नुकशान भरपाई आता प्रशाशनाकडून त्यांच्या खात्यावर्ती जमा केला जय आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. यातील बाधित 82 हजार 698 शेतकर्यांच्या खात्यात डिबीटी पद्धतीद्वारे 58 कोटी 53 लाख 11 हजार इतका निधी जमा करण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकर्यांना तत्काळ उपलब्ध व्हावी याकरिता शासनस्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन- जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकर्यांना तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 1 लाख 76 हजार 201 बाधित शेतकर्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डिबीटी पद्धतीद्वारे 82 हजार 698 बाधित शेतकर्यांच्या खात्यात 58 कोटी 53 लाख 11 हजार 141 रुपये इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.
बाधित शेतकर्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकर्यांनी आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी केली नसल्यामुळे अजूनही 80 हजार 722 बाधित शेतकर्यांच्या खात्यात मदत निधी शासनस्तरावरून वितरित करता आलेला नाही. शेतकर्यांनी तालुका कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडून व्हिके नंबर प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण किंवा ई-केवायसी करावे. त्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट त्यांचे बँक खात्यात जमा होणार आहे. ई-केवायसी करण्याची सर्व प्रकिया ही शेतकरी बाधंवांसाठी निःशुल्क असून याबाबत कोणतीही रक्कम सेतू चालकास अदा करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.












