शेतकऱ्यांकडून शेतीत अधिक उत्पन्न निघावे यासाठी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर केला जातो.यामुळे काही दुष्परिणाम देखील होतात. अशे अनेक रासायनिक खते आहे. ज्यांचे दुष्परिणाम आवण आज बोगतोय शेतीत अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने रासायनिक खताचा वापर दिवसागणिक वाढत आहे. साधारणतः १९६० पासून युरियापासून रासायनिक खत शेतात टाकण्यास सुरुवात झाली. सध्या रासायनिक खतावर अधिक भर देण्यात येत असून, ५८ हजार हेक्टर शेती क्षेत्रात ७८८ मेट्रिक टन खताचा वापर यावर्षी झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.
युरिया २७५ मेट्रिक टन, डीएपी १३० मेट्रिक एमओपी ६ मेट्रिक टन, सिंगल सुपर, १०-१०-२६, २०-२०-१३, १२-३२-१६, १५-१५-१५ आदी मिश्रखते ३७० मेट्रिक टन यासह इतर खते ७ मेट्रिक टन, असा एकूण ७८८ मेट्रिक टन रबीसह खरिपात रासायनिक खतांचा वापर झाल्याचे पुढे आले आहे. शेतीच्या हेक्टरी खत वापरातून ही माहिती मिळत असून, दरवर्षी कमी-अधिक पाऊस पडण्यावर खताचा वापर त्यानुसार करण्यात येतो. पाऊस अधिक झाल्यास पिके पिवळी पडून वाढ खुंटते, तेव्हा पिकाला अधिक मात्रेची खते द्यावी लागतात.
रासायनिक खताचा वापर कमीत कमी करण्यासाठी शासकीय, सेवाभावी संस्थांकडून प्रयत्न होत असून, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. तीस वर्षांपूर्वी शेणखताला शेतकरी महत्त्व देत होते.












