पिंपरी चिंचबड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेञात गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झालेने पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी
यांना गुन्हेगारी वृत्तीचे इसमांना ताब्यात घेवुन योग्यती करणेबाबत आदेशीत केले होते.
वाकड पोलीस स्टेशन हद्दीत देखील मालमत्ता व शरीराविरुध्द्च्या गुन्हयांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असल्याने आयुक्त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना गुन्हेगारी वृत्तीचे लोकांवर लक्ष ठेवुन बेकायदेशीर कृत्य करीत असताना मिळुन आलेवर कायदेशीर कारबाई करणेबाबत आदेश दिले होते.
अक्षय विलास केदारी, वय २८ वर्षे, रा. पवारनगर, थेरगाव, वाकड यांनी वाकड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली की,
काही लोक बुलेट व अँक्टिव्हा गाडीवर हातामध्ये पिस्टलसारखे हत्यार, कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या घेवुन येवुन हत्यार हवेत फिरवुन आजुबाजुच्या राहणारे लोकांमध्ये दहशत निर्माण करुन तसेच त्यांचेकडे असलेल्या बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडुन, रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व वेस्पा गाडी कोयत्याने फोडुन नुकसान केले व त्यांच्या खिशातील रोख रक्कम १६०० रु. व त्यांचे मित्र यश सपकाळ यांच्या खिशातील १२०० रु व मित्र अजय नवले यांच्या खिशातील ७०० रुपये असे एकुण मिळुन ३५००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेवुन धमकी देवुन परिसरात दहशत निर्माण केली आहे अशा.
सदरची घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेश जवादवाड, यांनी तपास पथकातील पो.उप.नि. सचिन चव्हाण व पो.उ.पनि.अनिरुध्द् सावर्डे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अंमलदार यांना तात्काळ सदरचे गुन्हयातील आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे दोन वेगवेगळे पथके तयार करुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा दाखल होताच अवघ्या ०६ तासाचे आत एकुण १२ आरोपींना वाकड गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली त्यापैकी ०८ आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपींची पोलीस कोठडी मंजुर करुन घेणेकरीता आरोपींना कोर्टासमोर हजर केले असुन पुढील तपास सपोनि.गायकवाड हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परि-२ बापु बांगर, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, पो.उप.नि. सचिन चव्हाण, पो.उप.नि.अनिरुध्द् सावर्डे, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, स.पो.फो. राजेंद्र
काळे, पो.हवा. संदीप गवारी, पो.हवा. वंदु गिरे, पो.हवा. स्वप्निल खेतले, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. अतिश जाधव, पो.हवा.प्रमोद कदम, पो.हवा. विक्रांत चव्हाण, पो.हवा. अतिक शेख, पो.ना. प्रशांत गिलबिले, पो.शि. अजय फल्ले,
पो.शि. भास्कर भारती, पो.शि. स्वप्निल लोखंडे, पो.शि. कौंतेय खराडे, पो.शि रमेश खेडकर, पो.शि. ज्ञानदेब झेंडे, पो..शि.सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी केली आहे.












