आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२३ च्या पत्रकान्वये आगामी लोकसभा निवडणुका मुक्त आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्याकरिता दिलेल्या मार्गदर्शन सूचना/ निर्देशानुसार सर्व पोलीस आयुक्त व परिक्षेत्रिय विशेष पोलीस महानिरीक्षक
यांच्याकडून पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या २७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे तर २३ अधिकाऱ्यांची वर्णी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आणि त्या पुढील कंसात कुठून कुठे बदली झाले आहे पुढील प्रमाणे….
अजित लकडे (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
शिवाजी गवारे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
सुनील गोडसे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
शंकर डॅम्से (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
शैलेश गायकवाड (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
दिलीप शिंदे (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
शंकर बाबर (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
ज्ञानेश्वर साबळे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
रणजित सावंत (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
दीपाली धाडगे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
प्रसाद गोकुळ (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
सुनील पिंजण (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
रामचंद्रन घाडगे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
विश्वजित खुळे( पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
मछिंद्र पंडित (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
बाळकृष्ण सावंत (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
प्रकाश जाधव (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
दीपक साळुंके (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
शहाजी पवार (पिंपरी चिंचवड ते सोलापूर शहर)
किशोर पाटील (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
सुनील तांबे (पिंपरी चिंचवड ते ठाणे शहर)
रुपाली बोबडे (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
अरविंद पवार (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
युनूस मुलाणी (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
अनिल देवडे (पिंपरी चिंचवड ते छत्रपती संभाजी नगर शहर)
दशरथ वाघमोडे (पिंपरी चिंचवड ते गडचिरोली)
सोन्याबापू देशमुख (पिंपरी चिंचवड ते नागपूर शहर)
पिंपरी चिंचवड आयुक्तालय नव्याने बदली झालेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लावल्या नंतर त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.











