पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) दि. १४ :- पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम देशमुख सर व राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने विशेष शाखा गुन्हेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांना निवेदन देऊन हल्ला करणाऱ्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष सुरज साळवे,डिजिटल मिडिया अध्यक्ष राजु वारभुवन सल्लागार देविदास शेलार, चिराग फुलसुंदर, राम पाटील, सागर सूर्यवंशी, संदीप सोनार, विनय सोनवणे आदी पत्रकार व पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,शुक्रवार दिनांक ०९/२/२०२४ रोजी पुण्यामधे जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, जेष्ठ विधिज्ञ अॅड. आसिम सरोदे, जेष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला हा भाजपा च्या कार्यकर्त्यांनीच केला. सरकारने पोसलेले गुंड हे पत्रकार आणि बुध्दिजिवींवर सतत हल्ले करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वारंवार होत आहे. या झुंडशाहीच्या विरूध्द योग्य तीण कारवाई करावी. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतिने भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.












