मुंबई : सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती सरकार मार्ग काढायला तयार नाहीये आणि दुसरीकडे सर्रास पैश्यांची उधळण वेगवेगळ्या कामांवरती होत आहे. संशोधनावरती काम करणे ही काळाची आणि देशाची गरज असताना सरकार मात्र संशोधकांचे मानसिक खच्चीकरण करत आहे. सर्व पात्र संशधोकाना फेलोशिप द्यावी या भूमिकेतून विद्यार्थ्यांचे तीव्र बेमुदत साखळी उपोषण मुंबई येथे सुरू आहे.
मुख्यसचिव ह्यांच्या अध्यक्षते खाली तीनही संस्थेच्या संबधित अधिकारी यांची दिनांक ०१ जून २०२३ रोजी एक बैठक पार पडली ह्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार सर्व विभागाच्या सचिव ह्यांनी मराठा कुणबी, अनुसूचित जातीतील(SC), इतर मागासवर्गीय OBC, (भटके विमुक्त (VJNT, (विशेष मागास प्रवर्ग (SBC, आणि इतर नॉनक्रेमिलियर समूहातील संशोधक विद्यार्थ्यावर अन्यायकारक असा निर्णय घेतला संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी तिन्ही संस्थातील जागा कमी करण्याचा ठराव करून अधिकारी वर्गाने समंत करून बहुजन समुदायाबद्दल असंवेदनशीलता दाखवली आहे. सारथी बार्टी व महाज्योती या संस्थाच्या माध्यमातून संबधित समुदायातील विद्यार्थी यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप देण्यात येते. परंतु ३० ऑक्टोबर चा अध्यादेश काढून समान धोरण समोर करून सर्व सामान्य संशोधकांवर अन्याय केला आहे.तुकाराम शिंदे












