बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ येत्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहेत. अक्षय आणि टायगरपहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता देखील वाढली आहे.
हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अशातच लखनऊमध्ये प्रमोशनदरम्यान जमावाने गर्दीत दगडफेक केली.आणि चपलादेखील फेकल्या.
सोमवारी 26 फेब्रुवारी 2024 रोजी अक्षय आणि टायगर ‘बडे मिया छोटे मिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला गेले होते. त्यांनी लाइव्ह स्टंट करून चित्रपटातील काही वस्तू भेट देऊन चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे दोघांनी चाहत्यांच्या दिशेने मोफतच्या वस्तू फेकल्या.
मोफतच्या वस्तू जमा करण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. माहितीनुसार, या गोंधळात जमावाने दगडफेक आणि चपलाफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा जवानांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अक्षय आणि टायगरच्या स्टंटबाजीदरम्यान जमावामध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. अक्षय कुमारने यावेळी एका मोकळ्या मैदानात स्टंट देखील करून दाखवला. मात्र, कार्यक्रम संपत असताना मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलंय. एवढंच नाही तर कार्यक्रमात दगडफेक देखील झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्टेजजवळ जाऊ पाहणाऱ्या गर्दीला रोखत सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मोफतच्या वस्तू फेकल्यानंतर अक्षयने चाहत्यांना विनंती केली. तो म्हणाला, “मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, कृपया करून तुम्ही धक्काबुक्की करू नका. तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्याशी बोलण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.












