केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना समन्स पाठवले आहे. अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव समन्स पाठवण्यात आले आहे.
अखिलेश यांना साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगितले आहे.अवैध खाण प्रकरणी उत्तर देण्यासाठी उद्या गुरुवारी (२९ फेब्रुवारी) अखिलेश यादव यांना सीबीआयसमोर हजर राहण्याचे नोटिसीमधून सांगण्यात आले आहे.
२०१२-२०१६ दरम्यान हमीरपूरमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित हे प्रकरण आहे.या प्रकरणी जानेवारी २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी आणि इतरांसह अनेक अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला होता.सरकारी कर्मचाऱ्यांनी हमीरपूरमध्ये अवैध खनिज उत्खनन करण्यास परवानगी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये नोंदवण्यात आला आहे.












