
मॉलच्या प्रवेशद्वारावर दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या चौघांना गाडीचा हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने चार जणांनी एका व्यक्तीला हाताने व काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार हडपसर येथील अॅमनोरा मॉलच्या गेटसमोर घडला.
याबाबत धनंजय पंडीतराव सावंत (वय-४४ रा. अॅडरीनो, अॅमनोरा, हडपसर) यांनी गुरुवारी (दि.२१) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन दोन दुचाकीवर बसलेल्या चार जणांवर भा.दं.वी. कलम ३२४, ३२३, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे सीझन मॉल येथून त्यांची चारचाकी गाडीने अॅमनोरा मॉलमध्ये जात होते. त्यावेळी मॉलच्या प्रवेशद्वारासमोर आरोपी त्यांच्या दुचाकीवर बसले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.












