पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१८ : अशोक चौकत एकावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या टोळी प्रामुखासह दोघांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४९ वी मकोका कारवाई आहे.
अमन युसूफ पठाण ऊर्फ खान (वय २३ रा. नाना पेठ), आवेज अश्पाक शेख (वय २२ बाबूभाई वाडा,गणेश पेठ), स्वप्नील प्रशांत शिंदे वय १९ रा.के.के.मार्केट, धनकवडी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. सदर टोळी प्रमुख काही नवीन साथीदारांसह टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
सदर फिर्यादी व त्यांचे काका दि.५ ऑगस्ट रोजी आरोपी आवेज शेख याला समजावण्यासाठी अशोक चौकात आले असता सदर आरोपींनी फिर्यादीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस स्थानकात भा.द.वि कलम ३०७,३२४,५०४,५०६,३४ क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, महाराष्ट्र पोलीस आधि कलम ३७ (१)(३) १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त अशोक धुमाळ करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि-1 संदीपसिंह गिल, सह पोलीस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलीस आमदार संतोष थोरात, किरण शितोळे यांनी केले आहे.
अमन युसूफ पठाण सह टोळीतील दोघांवर मकोका कारवाई












