पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. एका 24 वर्षे तरुणी सोबत मैत्री करून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 2019 ते 2023 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला, मात्र पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी तरुणाविरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार आरोपी तरुण आणि फिर्यादी तरुणी एकमेकांचे मित्र होते. आरोपीने फिर्यादीला कात्रज येथील एका लॉजवर नेले आणि मारहाण करत तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.या संपूर्ण घटनेचा त्या तरुणाने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.
त्या नंतर आरोपी ने फिर्यादी च्या मित्राला अश्लील व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.












