पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१६ : नवरात्र व दसऱ्याच्या कालावधीमध्ये मावळात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. मावळ तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ९ ग्रामपंचायती च्या पोटनिवडणुका व दोन ठिकाणच्या सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
सरपंच पद थेट जनतेमधून असल्याने या पदावर वर्णी लागण्यासाठी जोरदार तय्यारी सुरू असून मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला जात आहेत. खरंतर ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय चिन्ह वापरली जात नसल्याने ती गावकी व भावकीवर लढवली जाते. असे असले तरी ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी
राजकीय नेते मंडळी ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याने वातावरण तापत आहे. यामधून मोठी चुरस निर्माण होत असते. ५ नोव्हेंबर रोजी
मतदान होणार आहे.
या गावात होणार निवडणूक :
जांबवडे, सदुंबरे, सुदवडी, साळुंब्रे, बेबडओहळ, लोहगड, शिलिंब, कोंडिवडे (आ. मा.), कल्हाट, आंबळे, भाजे, सांगीसे, मुंढावरे, उदेवाडी, मळवंडी ढोरे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बू. या १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तसेच शिरगाव व पुसाणे येथील थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. याशिवाय चिखलसे १ जागा, शिवणे २ जागा, नवलाख उंबरे 1 जागा, कुसगाव बु. २ जागा, पुसाणे ७ जागा, दारुंब्रे ३ जागा, तुंग १ जागा, खांडशी १ जागा व कान्हे १ जागा अशा ९ ग्रामपंचायतीच्या एकूण जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे –
१) नामनिर्देशन पत्रे दाखल करणे – १६/१०/२०२३ ते २०/१०/२०२३ वेळ सकाळी ११ ते दुपारी ३
२) नामनिर्देशन पत्र छाननी – २३/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
३) नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारिख व वेळ – २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत
४) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढणाऱ्या
उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ – २५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० नंतर
५) प्रत्यक्ष मतदानाची तारिख –
०५/११/२०२३ (रविवार) सकाळी ७.३०
पासून सायंकाळी ५.३० पर्यंत
६) मतमोजणी व निकाल ०६/११/२०२३












