पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०७ : टोळी प्रमुख विनोद बालाजी सोमवंशी आणि त्याच्या १२ साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी विनोद बालाजी सोमवंशी ( वय-२० वर्ष रा. जांभुळवाडी, दत्तनगर, पुणे ), आकाश गुलाबराव कांबळे ( वय-२१ वर्षे, रा. जांभुळवाडी रोड,आंबेगाव-खुर्द, पुणे ), आदीत्य विनोद नाईक ( वय-२३ वर्षे, रा. हनुमाननगर आंबेगाव खुर्द, पुणे ), गोविंद बबन लोखंडे ( वय १८ वर्षे, रा. जांभुळवाडी रोड, कात्रज, पुणे ), भुषण विनोद भांडवलकर ( वय १९ वर्षे, रा. जांभुळवाडी रोड आंबेगाव-खुर्द, पुणे ), प्रविण रामा गुडे ( वय-२३ वर्षे, रा. कात्रज, पुणे ), अभिषेक देविदास भगुरे ( वय-१८ वर्षे,कात्रज, पुणे ) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सर्वे नं.३३, जांभुळवाडी रोड, शनीनगर, आंबेगाव-खुर्द, पुणे येथे दोन मजली बिल्डींग असुन, पहिल्या मजल्यावर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे आणि ते त्यांनी भाड्याने दिले आहे.
दि.०५ रोजी सायंकाळी आरोपी यांनी फिर्यादी यांच्या बिल्डींग मध्ये येवुन, बेकायदेशीर जमाव जमवुन, फिर्यादी व त्यांच्या भाडेकरू यांच्याकडे खंडणी मागितली. बिल्डींग मधील फिर्यादी यांच्या घराच्या दारावर, खिडक्यांवर लाथाने व दगडाने मारून, फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांच्या पार्कींग मधील वाहनांची तोडफोड केली.
तसेच फिर्यादी यांच्या नातेवाईकांना मारहाण करून, फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने, त्यांच्या मुलाच्या डोक्यात धारधार हत्याराने मारून, त्यांना गंभीर जखमी करून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपींनी आतापर्यंत नविन साथीदार यांना सोबत घेवुन, स्वतःची संघटीत टोळी तयार करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतुने व इतर फायदयासाठी दरोडा, खंडणी, खुनाचा प्रयत्न, दंगा, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, अग्नीशस्त्रे जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमतेचे नुकसान करणे जनमानसात दहशत पसरविणे या सारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.
अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील यांच्या आदेशावरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड यांनी पोलीस उप-आयुक्त, परि-२. पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील यांचे मार्फत आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
आरोपींविरोधात भादवि कलम ३०७,३८५, ३८७,३२४,४५२,१४३,१४४,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६(२),१२०(ब),४२७, क्रिमीनल लॉ अमेंडमेट कायदा कलम ७, आर्म ॲक्ट कलम ४ (२५), महा. पो अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ बालन्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम सन २०१५ चे कलम ८३ (२), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii).३ (२), ३ (४) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्हयाचा पुढिल तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगांवकर हे करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. संदिप कर्णीक, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-२, पुणे शहर, श्रीमती. स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. विजय पुराणिक, श्री. गिरीश दिघावकर, सहा पोलीस निरीक्षक, कुलदीप व्हटकर, सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, मोहन कळमकर व सहा. पो. फौज, चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार, नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे यांनी केली आहे.












