मुस्लिम समाजाकडून सह आयुक्त परिमंडल २ यांना निवेदन
देहूरोड येथील बालविवाह प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपल्याला यासंदर्भातील अनेक बातम्या ऐकायला मिळतात. या विषयमाधील आरोपी असलेले मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुक्तार शेख यांचा अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला होता.
मौलाना मुक्तार यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक रविवारी त्यांना देहूरोड येथील पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकारी सह पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांच्यासमोर हजर होऊन रजिस्टरमध्ये सही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना दि. ८ रोजी फोन करून पोलीस स्टेशनला बोलून घेतलं व तिथे बोलवून त्यांना मारहाण केली असे आरोप मौलाना मुक्तार यांनी केले आहेत.
ही गोष्ट संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये आगीसारखी पसरली व याची दखल पिंपरी चिंचवड येथील मुस्लिम समाजाच्या संस्थांनी घेतली असून दि. ९ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर मुस्लिम समाजाचा मोठा जमाव पाहायला मिळाला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सहकाऱ्याच्या सांगण्यावरून या समाजाच्या एका शिष्टमंडळाने सह पोलीस आयुक्त परिमंडल २ त्यांच्या कार्यालयाला भेट देत सह पोलीस निरीक्षक गज्जेवार यांच्यावर कारवाईची मागणी करत निवेदन दिले.
सह पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी त्वरित देहूरोड विभागाचे सहा. पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांना फोनवरून संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले व निवेदन ही त्यांच्याकडे वर्ग केले, मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने सहा. पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या कार्याला भेट देत त्यांना निवेदन दिले व त्या ठिकाणी मौलाना मुक्तार यांचे जबाब नोंदविण्यात आले, आम्ही लवकरात लवकर सदर बाबतची चौकशी करून चौकशीचे अहवाल माननीय सह पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे व माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना पाठवणार आहोत असे सहा पोलीस आयुक्त घनवट यांनी सांगितले आहे.
दरम्यान देहूरोड येथील हैदर शेख हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असताना ‘माझे नाव या प्रकरणांमध्ये नसतानाही मला अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून या तपास अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिला आहे व त्याचप्रमाणे मारहाण देखील केली आहे त्याचप्रमाणे देहूरोड येथील एका व्यक्तीने त्यांना एक लाख रुपये ची मागणी करत आम्ही साहेबांना सांगून तुझं नाव या प्रकरणामधून काढून टाकू असे सांगितले असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे व या संदर्भात हैदर शेख यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अर्ज दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.












