पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : पुणे ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी सभासदांच्या नोंदणीची सुरुवात करण्यात आली आहे. ही निवडणूक दि. ३१ जानेवारी २०२४ ला होणार आहे.
या निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सभासदांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून याची अंतिम तारीख २२ डिसेंबर ही असणार आहे. ज्या वकील बांधवांची मागील वर्षीच्या मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट आहेत अशांनी फक्त पावतीची रक्कम भरायची आहे त्यांना कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही.
वकील बांधवांनी सभासद होण्यासाठी यांची सनद मागील १० वर्षांमधील असेल त्यांनी पन्नास रुपये व ज्यांची सनद मागील १० वर्षापेक्षा जास्त असेल त्यांनी शंभर रुपये फी भरून सभासदत्व घ्यावे किंवा दोन हजार रुपये भरून कायमस्वरूपी सभासद व्हावे
सभासद नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
- बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा चे ओळखपत्र झेरॉक्स
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
सर्व वकील बांधवांनी सभासद नोंदणीसाठी पुणे बार असोसिएशन कार्यालय, एस. बी. आय. बँकेचे मागे, शिवाजीनगर, पुणे येथे जाऊन आपल्या सभासद नोंदणीचा फॉर्म भरून घ्यावा तसेच ज्या वकील बांधवांनी कायमस्वरूपी सभासदत्व घेतले आहे त्यांनी वेगळा फॉर्म किंवा फी भरू नये.












