पुणे, दि. २ : ‘आंतरराष्ट्रीय एड्स दिवस’ निमित्त आज बै. जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने ससून रुग्णालय आवारात एड्स जनजागृती फेरीचे (रॅली) आयोजन करण्यात आले.
१ डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय एड्स दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त या रॅलीदरम्यान रुग्णालयातील रुग्ण व उपस्थित नातेवाईकांना एड्स संबंधातील समज व गैरसमज या बद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध संदेशाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
रॅलीत वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यासमवेत सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. यल्लापा जाधव आदींनी भाग घेतला.












