पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : शिवसेनेचे नवनिर्वाचित पुणे व सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय मशीलकर यांची नुकतीच शहरातील सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख बशीर सुतार, पिंपरी विधानसभा प्रमुख निखील येवले, शहर समन्वयक हेमचंद्र जावळे यांनी पुण्यातील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात भेट घेवून सत्कार केला.
यावेळी बाळासाहेब वाल्हेकर यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या.
यावेळी श्री मशीलकर यांनी कार्यकर्त्यासोबत चर्चा करीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन ,घरकुल,वाढती गुन्हेगारी यावर चर्चा केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवदूत, बूथप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख,विभाग प्रमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल जेणेकरून खासदार श्रीरंग बारणे तीन लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील,अशी ग्वाही त्यांनी दिली.
बाळासाहेब वाल्हेकर म्हणाले कि, पक्षातील जुने एकनिष्ठ व नव्याने समाविष्ट झालेल्या शिवसैनिकांसोबत पक्षश्रेष्ठीनी चर्चा करावी यातून कार्यकर्त्यांना बळ मिळेल.पक्षवाढीस चालना मिळेल. विधानसभानिहाय आम्ही करीत असलेल्या संघटनात्मक कार्याला अधिक गती येईल.आम्ही तर लोकसभा निवडणूक जवळ आल्याने कंबर कसली आहे.असे मत व्यक्त केले.












