ANI ने दिलेल्या वृत्तानुसार,संसदेच्या सभागृहात काल (दि.13) झालेल्या सुरक्षेतील कुचराई प्रकरणी अखेर लोकसभा सचिवालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.
तर, दुसरीकडे संसदेत आणि संसदेच्या बाहेर घोषणा देणाऱ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.












