मुख्याध्यापकास पुन्हा संस्थेने रुजू करून घेत नसल्याने त्यांनी नाशिक महापालिकेत अर्ज केला होता. ज्या संस्थेत ते काम करत होते तेथून त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी शैक्षणिक न्यायाधीकरण नाशिक येथे दात मागितली असता त्यांच्यावरील बडतर्फ या कारवाईला स्थगिती देण्यात आली . या अर्जाला उत्तर म्हणून संस्थेवर कारवाईचे पत्र देण्यासाठी आरोपी सुनीता सुभाष धनगर, प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग, महापालिका, नाशिक(Education Officer Curruption) यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच पत्र तयार करण्यासाठी आरोपी नितीन अनिल जोशी, कनिष्ठ लिपिक, शिक्षण विभाग, महापालिका, नाशिक यांनी पाच हजार रुपयाची मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदारांनी अँटी करप्शन ब्युरो नाशिक कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो ने सापळा रचला. शुक्रवारी दिनांक 2 जून 2023 रोजी शिक्षण विभाग महापालिका नाशिक कार्यालयात लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
यादरम्यान सुनील धनगर यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात तब्बल रोख 85 लाख रुपये , 32 तोळे सोने सापडले. तसेच सुनीता बनकर यांच्या नावावरती दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी भा प्र का सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












