पिंपरी(प्रतिनिधी) बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या मोस्ट पीपल्स कम्प्लिटिंग १०० मीटर्स ऑन स्केट्स ४८ आवर्स, अटेम्प्ट फॉर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी नवा विश्व विक्रम नोंदवला(World Record).
पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या 10 खेळाडूंनी यश संपादन केले.
शिवगंगा रोलर स्केटींग रिंकवर गिनीज बुकमध्ये नोंद होण्यासाठी मोस्ट पीपल्स कम्प्लिटिंग १०० मीटर्स ऑन स्केट्स ४८ आवर्स, अटेम्प्ट फॉर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात भाग घेवून तो रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण केला.
नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्स स्केटिंग क्लबचे खेळाडू
श्रीअंश विश्वकर्मा ( जी. के. गुरुकुल, पिंपळे सौदागर ) वय 4.5,
मुकुला अमित इंगळे ( विद्या व्हॅली स्कूल, नॉर्थ पॉईंट, चिंचवड ) वय 7,
शोयब समीर मणेरी पाटील ( विद्यानिकेतन प्राथमिक शाळा पिंपरी पुणे ) वय 7,
समर्थ तिवारी ( अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, वाकड ) वय 7,
विधान धनंजय हेडाऊ ( केन्द्रीय विद्यालय, रेंजहिल्स खडकी ) वय 9,
अभिनव दे ( एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल चिंचवड ) वय 11,
रुचिका वैभव बिळगी ( राहुल इंटरनॅशनल स्कूल हिंजेवडी ) वय 12,
गार्गी दिपक इंगळे ( एस एन बी पी स्कूल, पिंपळे सौदागर ) वय 13,
सना जोशी ( आर्मी पब्लिक स्कूल खडकी ) वय 13,
वैष्णवी सोनकर ( जय हिंद हायस्कूल स्कूल पिंपरी ) वय 14,
यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून महाराष्ट्राचे नाव उंचावले. संपूर्ण देशभरातील सुमारे पाचशे खेळाडू सहभागी झाले होते. यामधून श्रीअंश विश्वकर्मा हा सर्वांत अल्पवयीन खेळाडू ठरला. हे सर्व स्केटर्स पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक व वाकड ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम्झ स्केटिंग क्लब रिंग येथे सराव करतात.
रेकॉर्ड अटेम्प्ट चालू असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तरीही मुलांनी दिवस रात्र ४८ तास स्केटिंग चालू ठेवत हा रेकॉर्ड अटेंम्ट यशश्वी पणे पूर्ण केला. वर्ल्ड रेकॉर्ड अटेंम्ट यशस्वीपणे पूर्ण होताच नाना काटे सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल (नाना) काटे यांनी व्हिडिओ कॉल करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. विजेत्यांमध्ये श्रीअंश विश्वकर्मा, विधान धनंजय हेडाऊ, रुचिका वैभव बिळगी, कृतिका दत्तात्रय मोरे या चार स्केटर्स नी मालदीव येथे नुकत्याच पार पडलेल्या सेकंड इंटरनॅशनल रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये अकरा गोल्ड व तीन सिल्वर मेडल्स मिळवत देशाचे नाव मोठे केले आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 12 मे ते 13 मे 2023 रोजी मालदीव देश येथील हूलहूमाले व माले शहरामध्ये आयोजित केली होती. ही स्पर्धा रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव तर्फे आयोजित करण्यात आली होती तसेच स्पोर्ट्स अथोरिटी गव्हर्मेंट ऑफ मालदीव व इंटरनॅशनल ओलंपिक कमिटी मालदीव यांची या स्पर्धेस मान्यता प्राप्त होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे सूत्रसंचालन मालदीव स्केटिंग असोसिएशन चे अध्यक्ष सुलपीकर अली, मोहम्मद हनिम व स्पोर्ट्स एल.यु.पी. कोऑर्डिनेटर राहुल बिळगी यांनी केले होते. या सर्व भारतीय स्पर्धकांना स्पोर्ट्स एल.यु.पी यांच्या कडून तीस हजार रुपयांची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप देण्यात आलेली.
तसेच मागील आठवड्यात पिंपळे सौदागर येथे पार पडलेल्या उमेश काटे स्पोर्ट्स फाऊंडेशन व नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित दहा दिवसीय प्लेसको स्पोर्ट्स कार्निवल मध्ये क्लब च्या ताथवडे वाकड व पिंपळे सौदागर येथील स्केटर्सनी नी 15 सुवर्ण, 15 रजत, व अकरा कांस्य पदके मिळवून पिंपरी-चिंचवडमध्ये क्लब चे नाव मोठे केले व सर्वात जास्त मेडल मिळवून क्लब पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला.
सर्व स्पर्धकांना क्लबचे हेड कोच वैभव बिळगी, राहुल बिळगी तसेच वंदना बिळगी , सुरज दीक्षित, चिंतामण राऊत, रिषभ गावंडे, पूजा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.












