पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१६ : लोणीकाळभोर परिसरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून ११ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे कोकेन,एम डी, एम डी एम ए पिल्स, कॅथा ईडूलस खत व इतर ऐवज जप्त कारण्यातर आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -१ ने केली आहे.
फिलिप विलियम इडीला (वय ४९ रा. कोठारी फॅशन,आर्चिवर शाळा, उरुळी देवाची, हडपसर (मूळचे नायजेरियन देश) व एक महिला असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी काळभोर परिसरात (दि.१५) अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंगवर होते. त्या दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण उत्तेकर व पांडूरंग पवार यांना माहिती मिळाली की सदर रेकॉर्ड वरील आरोपी मैत्रिणीसह उरळी देवाची परिसरात वेगवेगळ्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाझेरिअन नागरिकांवर छापा टाकून कारवाई केली. त्यांच्या कडून ५ लाख १६ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम ८ मिली ग्रॅम कोकेन, १ लाख १० हजार रुपये किंमतीचे एम डी एम ए च्या ५ ग्रॅम ५ मिली ग्रॅम वजनाच्या १२ पिल्स, १ लाख २ हजार रुपये किंमतीचे कॅथा ईडूलिस खात १ किलो २७५ ग्रॅम, ३ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे एम डी १८ ग्रॅम ९ मिली ग्रॅम तसेच दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, दुचाकी, तीन मोबाईल, एक पर्स, कॅमरुन देशाचा पासपोर्ट असा एकूण ११ लाख ८८ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीं विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अक्ट कलम ८(क), २१(ब), २२(ब), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे एक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथक एक पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सह पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी, संदीप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, विशाल शिंदे, नितेश जाधव, रेहना शेख, योगेश मोहिते यांनी केले आहे.












