पिंपरी – आज ८ मार्च जागतिक महिला दिन. आज सर्वत्र स्त्री शक्तीचा गौरव करण्यात येतो. यानिमित्त आज पुण्यात आणि पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठी आज काही खास सुविधा देण्यात आल्या आहेत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत पीएमपीएल प्रशासनाने एक निर्णय घेतला. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. यासाठी १७ विशेष बसमधून महिलांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान तेजस्विनी बसमध्ये दर महिन्याच्या आठ तारखेला दिवसभर महिलांना मोफत प्रवास करता येतो.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात आहे. आज महिला दिवस रात्र पुरुषांच्या बरोबरीने बाहेर काम करताना दिसतात. आज महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरू शकते. बसने प्रवास करू शकते. त्यामुळे त्यांना प्रवासात काही अडचणी येऊ नये. त्यांची जास्त दगदग होऊ नये यासाठी पीएमपीएल प्रशासनाने अनेक सोयी सुविधा केलेल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या पीएमपीएमएलमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली असते. मात्र, महिलांसाठी स्वतंत्र बस धावण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. आणि आता अनेक ठिकाणी फक्त महिलांसाठी विशेष बससेवा देण्यात येते. आणि दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत बससेवा देण्यात येते. आणि आजही महिलांसाठी मोफत बससेवा देण्यात आली. काही ठराविक मार्गांवर हि मोफत बससेवा आहे. ज्या मार्गांवर महिला प्रवाशांची वर्दळ जास्त आहे त्याच मार्गांसाठी मोफत बससेवा देण्यात आली.
ज्या मार्गावर महिला प्रवाशांचे प्रवास करण्याचे प्रमाण अधिक असते, त्यानुसार हे मार्ग ठरवले आहेत. त्यानुसार मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७), चिखली ते डांगे चौक (३५५) यासह पुण्यातील स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४), एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३) या बसचा समावेश आहे. या मोफत बससेवेचा वापर जास्तीत जास्त महिलांनी करावा असं आवाहन पीएमपीएमच्या वतीने करण्यात आलं आहे.