पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : मा.आयुक्त रितेश कुमार यांच्या मकोका कारवाईने अर्धशतक गाठत गोल्डन जुब्ली पूर्ण केली आहे.त्यांनी पदभार स्वीकारल्या पासूनची ही त्यांची ५० वी कारवाई आहे.
अभिषेक उर्फ अभि रमेश तांबे ( वय २१, रा. लेन नं.८. मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे ), सुमित नागेश लंगडे ( वय २५, रा. इंदिरानगर बर्मासल लोहगाव रोड, पुणे ), प्रज्वल प्रशांत शिंदे ( वय १८ वर्षे, रा. स.नं. ५५/१, तिरूपती इन्क्वलेव्ह, गोकुळनगर, बस स्टॉप, धानोरी रोड पुणे ) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींचे फिर्यादीच्या आत्याच्या मुलासोबत भांडण झाले होते. त्याच कारणासाठी आरोपी हे त्या मुलाला शोधत होते.तो मिळाला नाही म्हणून आरोपींनी फिर्यादींकडे त्याच्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी मला माहित नाही असे सांगितले.त्याच रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत जखमी केले आहे.
आरोपींवर भा.द.वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आर्म ॲक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची चौकशी करत असताना त्यांनी खुन,खुनाचा प्रयत्न,खंडणी मागणे, धारदार हत्यारे जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहे. त्यांच्यावर अनेक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुनः पुन्हा गुन्हे केले आहेत.त्यांच्यावर दाखल गुन्ह्याचा अधिक तपास करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त श्री शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. बाळकृष्ण कदम पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्रीमती. कांचन जाधव, पोलीस उप निरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार सचिन माळी, सचिन शिंदे, पवार व देविदास वांढर यांनी सदरची कारवाई केली आहे.












