
पुणे, दि. २० : पुणे मनपा हद्दीतील मुंढवा चौक येथे पुणे महानगरपालिका भूसंपादन विभागाकडून अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे .ही घटना मुंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
मुंढवा चौक येथील भूसंपादन जागेवरील ३२ वर्षांपासून अतिक्रमणाची कारवाई रखडलेली होती या कारवाईसाठी स्थानिकांचा खूप विरोध होता.
पुणे शहरातील वाढलेल्या औद्योगिकरणा मुळे आणि वाढलेल्या रहदारीमुळे हडपसर परिसरातील रस्त्यावर वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता या परिसरातील नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस व पुणे महानगरपालिका यांनी स्थानिक नागरिक कार्यकर्ते कोद्रे, लोणकार, गायकवाड, झुरुंगे इ. स्थानिक परिवारातील नागरिक यांच्या सोबत वेळोवेळी चर्चा करून नागरिकांनी कायदेशीर कारवाईस सहकार्य केले आहे .
मुंढवा चौक येथील रस्ता रुंदीकरण अतिक्रमणाची कारवाई पुणे पोलीस, महापालिका, अतिक्रमण विभाग,रस्ते विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने शांततेत पार पडली. येथील अतिक्रमण कारवाईमुळे रस्ता२४ मीटर रुंद झाला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिक व पुणेकरांची काही प्रमाणात वाहतूक कोडींतून सुटका झाली आहे.
सदर कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा मा महानगरपालिका अति आयुक्त, पुणे मनपा, श्री विकास ढाकणे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शना खाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे व ११ अधिकारी व ५० अंमलदार तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी श्री.एस.ई. दांडगे, श्री. रनवरे, श्रीमती रुपाली ढगे हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर बाळासाहेब ढवळे व इतर अधिकारी व स्टाफ तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्यातून शांततेत पार पडली आहे.












