पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : पिंपरी चिंचवड परिसरातील होस्टेल मधून चार मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
विनोद एकनाथ जायभाये ( वय २६, रा .लाईफ पॉईंट होस्टेल वाकड ) असे फिर्यादीचे नाव असून त्यांनी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक 23 रोजी वाकड येथील हॉस्टेल या ठिकाणी सोसायटीच्या दुसरे व तिसऱ्या मजल्यावरील फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.
चोरीला गेलेले मोबाईल अनुक्रमे ओप्पो कंपनीचा निळ्या रंगाचा दहा हजार रुपयांचा एक मोबाईल, वन प्लस कंपनीचा दहा हजार रुपयांचा एक मोबाईल, विवो कंपनीचा दहा हजार किमतीचा एक मोबाईल, ओप्पो कंपनीचा दहा हजार रुपयांचा एक मोबाईल असे एकूण ४० हजार रुपयांचे चार मोबाईल चोरीला गेले आहेत.
आरोपीवर भादवि कलम ३८० अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी हे करत आहेत.












