पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : महिलेला विनाकारण त्रास देणारा इसम पोलिसांचे नाव एकदाच पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून एका महिलेने अनिल रासकर ( वय ४८, रा .कर्मवीर सोसायटी, दिघी ) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी या त्यांच्या घरासमोर साफसफाई व गवत काढण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी याने फिर्यादी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांच्या कंपाउंड मध्ये प्रवेश केला. कशाला साफसफाई करते,ही जागा तुझ्या बापाची आहे का असे म्हणत बाजूला पडलेले लाकूड फिर्यादी यांच्या उजव्या पायावर मारले. तुला मारूनच टाकेल तुला राहून देणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला ढकलले असता त्यांनी फिर्यादी यांचा गळा पकडून त्यांच्या डाव्या गालावर कानसुळात मारली. तसेच फिर्यादी यांनी पोलिसांना कॉल केला असता आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाला आहे.
आरोपीवर भादवि कलम ३२४,४४७,३२३,५०४,५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे हे करत आहेत.












