पुणे प्रतिनिधी
चाकण (प्रतिनिधी) निगडी येथील लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फौंडेशनच्या वतीने मोफत नेत्रतपासणी आणि चष्मा वाटप करण्यात आले.शिबिराचे उदघाटन लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फौंडेशनचे व्यवस्थापक राजपाल आर्य,सरपंच अर्चना म्हाळूंगकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर पाहुणे म्हणून महिंद्रा कंपनीचे संजय जैन,अमित देसाई, सुधीरकुमार आगरवाल आदी उपस्थित होते.
यावेळी ५०० जणांची नेत्र तपासणी केली. यापैकी २५० जणांना चश्मे वाटप करून १०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
धर्मादाय दवाखाना
जावळे कॉंप्लेक्स , म्हाळुंगे – आंबेठाण रोड, महाळुंगे(इंगळे) चाकण या ठिकाणी संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाठक यांनी केले.












