पिंपरी(प्रतिनिधी) महाविद्यालयातील धमाल, ग्रुप मध्ये केलेला अभ्यास, शिक्षकांची आदर युक्त भीती, महाविद्यालयातील विविध स्पर्धा, शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा, मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा च्या वेळेची परिस्थिती, शैक्षणिक सहल, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करत जुन्या आठवणी मध्ये हरवून गेले होते.
निमित्त होते आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा. 1988 ते 2015 जवळपास 28 वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी व्यासपीठावर डी वाय पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व डाटा टेक लॅबचे सीईओ डॉ. अमित आंद्रे, खजिनदार नीलम पाटील, झेंडा मार्क इंडिया चे सीईओ हिमांशू जाधव व योन लॉजिकलचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद सानप, जॉन्सन कंट्रोल चे असोसिएट डायरेक्टर तुषार जाधव, कंट्रोलॉजिक्स इंजिनिअरिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल ढोबळे व आयक्यूबचे सीईओ प्रतिक ओसवाल, डी वाय पाटील महाविद्यालयाचे प्रा प्रशांत तीतरे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती आदी उपस्थित होते
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या सध्याच्या प्रगतीची माहिती दिली .महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संपूर्ण जगात आपला ठसा आपल्या कार्यामधून उमटवित असल्याने त्याचा महाविद्यालयास सार्थ अभिमान असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हनी विल्यम्स यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा जस्मिता कौर यांनी केले.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा नीलम पाटील व प्रा विपिन विभुते होते. या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यासाठी संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील व विश्वस्त तेजस पाटील संकुलाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पी मालती, उपप्राचार्य डॉ. एस एस सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले .












