बाणेर परिसरातील एपीएस वेल्थ वेंचर्स कंपनीने जादा परताव्याचे अमिश दाखवून फसवल्याची घटना घडली आहे. कंपनीतील संचालकांनी सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे परतावा परत करत फिर्यादी व साथीदार यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवणूक करायला लावले. आतापर्यंत गुंतवणूकदारांची सुमारे 121 कोटी 34 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड सौ विशाखा अविनाश राठोड व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे भादविक 420 406 49 34 69 एम पी आय डी कलम तीन चार अन्वये दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विशाखा अविनाश राठोड यांचा अटकपूर्व जामीन मा सत्र न्यायालय, पुणे शहर यांनी फेटाळला आहे.
आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यांचे तपास पथक अविनाश राठोड, विशाखा राठोड व इतर आरोपींचा शोध घेत आहे.
सदर गुन्ह्यात पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, सहा पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त शाखा श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे पुणे श्री श्री श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्री विजय पळसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलम भगत व त्यांचे साथीदार करत आहेत.
एपीएस वेल्थ वेंचर्सच्या संचालकाचा जामीन अर्ज माननीय सत्र न्यायालयाने फेटाळला












