खडकी परिसरात दहशत माजविणाऱ्या चित्ता बाबर इराणी टोळीतील २१ गुन्हेगारांविरोधात मोक्का लावण्यात आला आहे.
दि.२१ एप्रिल रोजी फिर्यादी महिला यांचा भाऊ महमंद शौकत शेख यास आरोपी कासीम उर्फ चित्ता बाबर इराणी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर २१ साथीदार यांनी खाली पाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी फिर्यादी हया सदरची झालेली मोडणे सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही आरोपीत इसमांनी खाली पाडुन, त्यांचा विनयभंग केला होता. तसेच फिर्यादी यांचे भाऊ व मामे भाऊ यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांना हॉकी स्टिकने मारून दुखापत करून आरोपीतांनी वस्ती मध्ये काचेच्या बाटल्या व दगडफेक करून, त्यांचे हाता मध्ये असलेल्या धारदार हत्यारे दाखवुन सदर परिसरात दहशत पसरविली. सदरबाबत खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १२३ / २०२३ भादविक ३०७,३५४,३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५, सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात आठ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन (टोळी प्रमुख) कासीम उर्फ चित्ता बाबरबुरुज इराणी याचेसह इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
सदर प्रकरणाची खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. १२३ / २०२३ भादविक ३०७, ३५४,३२४,३२३, ५०४,१४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती आरती बनसोडे, सहा.पोलीस आयुक्त, खडकी विभाग करीत आहे
खडकीत दहशत माजविणाऱ्या चित्ता बाबर इराणी टोळी विरोधात मकोका कारवाई












