पिंपरी – देहूरोड येथे नुकतंच घडलेल्या खुनाचा प्रकारा नंतर काही गुंड पुन्हा परसिरत दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी तक्रार देहूरोड पोलिसांना मिळाली होती, त्याचप्रमाणे वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीसंनी आज (दि. १२ रोज श्री शिवाजी विद्यालय येथून, आंबेडकर रोड ते देहूरोड बाजारपेठ, अबुसेठ रोड, एम बी कॅम्प, ते नेटके कॉलनी विकास नगर येथून शिंदे पेट्रोल पंप ते पुन्हा शीतळा नगर पर्यंत रूट मार्च काढला.
या रूट मार्चमध्ये देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप रयणवार, विशेष शाखेचे व. पो.नी. दिगंबर सूर्यवंशी देहूरोड पोलीस स्टेशनचे सहा. पो.नी. आशिष जाधव, वसंत देवकाते, उप पोलीस निरीक्षक नामदेव अंगज, धैर्यशील सोलंकी, देहूरोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस बल यामध्ये सामील होते.