पुणे प्रतिनिधी
पुणे दि.४ : कार्यक्रमामध्ये जातीवाचक शिवीगाळ करत साउंड सिस्टीम चालवणाऱ्यावर वार करणाऱ्या आरोपी सह चौघांवर कारवाई करण्यात आले आहे. ही घटना (दि.१) रोजी शास्त्रीनगर, कोथरूड येथे घडली आहे.
सदर घटनेचे पडसाद इतर ठिकाणी उमटू नये यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर घटनेची गंभीर दाखल घेत घटना स्थळी भेट दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी शास्त्रीनगर, कोथरूड, भूगाव, माताळवाडी,मुळशी ,वाघवाडी, पवना धारण परिसरात गुन्हे शाखा-२, युनिट १ ते ६,व खंडणी विरोधी पथक १ ते २ अधिकारी आणि अंमलदार यांनी सर्च अपप्रेशन राबवण्यात आले.
यातील आरोपी ओंकार रघुनाथ साळवी (वय ३२ रा शास्त्रीनगर, कोथरूड), आकाश दीपक लोयरे (वय २३ रा. भूगाव), अक्षय सुनील पवार (वय २७ रा. भूगाव),मयूर शंकर येनपुरे (वय २५ रा. भूगाव),व्यंकटेश हरिदास अंकुशने (वय २७ रा. वारजे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नावे आहे. या तील मुख्य सूत्रधार ओंकार साळवी हा गुन्हा केल्या नंतर फरार होता. सदर आरोपी हे कोथरूड भागातच लपून बसले होते. त्यांच्या कडून सात मोबाईल व दोन मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपी विरोधात भा.द.वि.कलाम ३०७,४२७,५०४,३४ आर्म ऍक्ट ४(२५) अनुसूचित जाती जमाती कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे,यांच्या मार्गदशन खाली सह पोलीस आयुक्त गुन्हे १ व २ ,युनिट १ ते ६, खंडणी व वाहन चोरी विरोधी पथक १ व २, पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.












