पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : विठ्ठल राव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक व पोलिस आयुक्तालया तर्फे मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित व्याख्यानात पोलिस निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी विविध व्यसने,व्यसनांचे दुष्परिणाम,व्यसनमुक्तीचे मार्ग या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे,सहाय्यक पोलिस शिवाजी घुले,पोलिस हवालदार प्रशांत बोमादंडी यांनी अंमली पदार्थां विषयी मार्गदर्शन केले.

व्यसन म्हणजे आपल्या जीवनावर घालण्यात आलेला एक दरोडा.त्यामुळे चांगली संगत असणे फार गरजेचे आहे. ड्रग्ज विकणे,बाळगणे,घेणे अशी चुकीची कामे करू नका.हे सर्व करणे कायद्याने गुन्हा आहे.रोज प्राणायम,योगा व व्यायाम करा.आपल्या आई वडीलांचे पांग फेडा असे वक्तव्य पोलिस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी केले.
यावेळी मोहिनी भोसले, मनीष कांबळे, महादेव कांबळे, कैदळे गोरक्षनाथ, रकटे मच्छिंद्र, शेंडगे अरविंद, पाटील घनश्याम, वहींदा अवटी, दिपाली जाधव, कमल गायकवाड, विवेक कांबळे, वाडकर कैलास आदी उपस्थित होते.












