पुणे प्रतिनिधी
पुणे दि.११ : रागाने बघत असल्याच्या कारणातून शिवीगाळ करत धारदार हत्याराने डोक्यात व पाठीत वर केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि.३१ जुलै रोजी घडली आहे. या प्रकरणी चौघांन विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख, वय २४ रा. दत्तवाडी), ऋषिकेश ऊर्फ भावड्या बबन धिवार (वय २१ रा. दत्तवाडी), नीरज सुनील खंडागळे (वय २० रा.सदर),विशाल ऊर्फ दौलत पिराजी आगम (वय ३४ रा. सदर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि फिर्यादी हे दि.३१ जुलै राजी मित्रासोबत मोबाईलवर बोलत असताना सदर आरोपींनी रागाने बघत असल्याच्या कारणावरून फिर्यादीला गंभीर जखमी केले होते.
पोलीस तपासा दरम्यान सदर टोळी प्रमुखा विरोधात ७ गुन्हे व त्याचा साथीदार ऋषिकेश धिवार याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. हे दोनीही आरोपी मिळून संघटित गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर टोळीने मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न,दुखापत करणे, अवैध्य रित्या शस्त्र बाळगणे, टोळीचे वर्चस्व वाढवणे व परिसरात दहशत पसरवणे, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.
सदर टोळी विरोधात पर्वती पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम ३०७,३२६,३२३,५०४,३४ आर्म अॅक्ट ४(२५), म.पो.अधि. कलम ३७(१) सह १३५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलाम ३(१)(ii),३(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुह्याचा पुढील तपास सह पोलीस निरीक्षक बाबासाहेब शेवाळे करीत आहेत. तसेच पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ही ४५ वी मोक्का कारवाई आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि-३ सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्थानक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, अंमलदार दीपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे यांनी केली आहे.












