मुंबई : अनुप कुमार सिंग यांची महाराष्ट्राच्या गृह विभागाचे प्रधान सचिव याचा पदभार स्वीकारला आहे. या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी प्रदान सचिव पदाची जबाबदारी अगदी शिताफीने पार पाडली आहे. या पार्शवभूमीवर दैनिक राज्य लोकतंत्रचे निवासी संपादक गणेश मोकाशी तसेच इंदोरचे उद्योजक परमेश्वर येवले यांनी श्री.अनुप कुमार सिंग यांची भेट घेतली आहे. गुरुवार (दि १०) रोजी मुंबई येथील त्यांचा कार्यालयात हि भेट घेण्यात आली आहे.
अनुप कुमार सिंग हे महाराष्ट्रात मिळालेल्या या पदोन्नती मुळे ते आनंदी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जाते. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अनेक विषयांमध्ये आपली भूमिका अत्यंत शिताफीने बजावली आहे.
गृह विभागातील प्रदान सचिव हे पद भूषवताना त्यांना अनेक अनुभव आले, या भेटी दरम्यान त्यांनी आपले अनुभव यावेळी मांडले.
या भेटी दरम्यान महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या प्रदान सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल त्यांना गौरविण्यात आले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.












