मुंबई प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे आज मुंबई उच्च न्यायालय येथे पुणे जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती मा. न्यायमूर्ती श्रीमती रेवती डेरे मोहिते मॅडम यांची भेट घेण्यात आली.
नेहरूनगर पिंपरी येथे नव्याने झालेल्या कोर्टामध्ये वकिलांसाठी कँटीन, झेरॉक्स मशीन, सिनियर डिव्हिजन कोर्ट , मोटर वाहन कोर्ट, बोऱ्हाडेवाडी मोशी येथे कोर्टाच्या नव्या जागेचे भूमिपूजन व बांधकाम सुरु करणे बाबत अश्या विविध विषयांवर चर्चा झाली.
पिंपरी नेहरूनगर कोर्टात कँटीनचे जादा भाडे पी. डब्यु. डी. विभागाने आकारले होते. ते भाडे कमी करून व झेरॉक्स मशीन तातडीने चालू करण्याच्या सूचना मा. न्यायाधीश डेरे मॅडम यांनी जिल्हा न्यायाधीश पुणे यांना दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच कँटीन व झेरॉक्स मशीन चालू होणार आहे.
तसेच मोशीच्या जागेवर पुढील महिन्यांमध्ये लवकरच कोर्ट उद्घाटनाची तारीख निश्चित करून भूमिपूजन होणार आहे. तसेच सिनियर डिव्हिजन बाबत पेंडिंग केसेस चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच सिनियर डिव्हिजन नेहरूनगर पिंपरी कोर्टाला मिळणार आहे. तसेच मोटर वाहन कोर्टाबाबत देखील पिंपरी-चिंचवड भागातील पेंडिंग केसेस चा अहवाल घेऊन त्यावर देखील मोटर वाहन कोर्ट देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.












