पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण महादेव पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांकडून पोलिसांना मिळालेल्या आदेशावरून पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान पेट्रोलिंग करत असताना आरोपी हा एस. पी कॉलेज जवळील खजिना विहीर तालीम समोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तेथे तो मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारां सोबत मिळून गुन्हा केला असल्याचे कबूल केले.
आरोपी विरोधात भादवि कलम ३७६ ( २ ) ( j ) ( n ) ( I ), ३५४ ( ड ), ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत आहेत.
ही कारवाई पुणे शहरचे मा.पोलीस आयुक्त, श्री. रितेशकुमार, मा.पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे, श्री. अशोक इंदलकर, पोलीस उप-निरीक्षक, शाहीद शेख, पोलीस अंमलदार, महेश पाटील, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, धनंजय ताजणे, गणेश ढगे, मॅगी जाधव, प्रदीप राठोड, आजीनाथ येडे, रविंद्र लोखंडे व नारायण बनकर यांनी केली आहे.












