पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०२ : चोरीचे सामान घेऊन बेपत्ता झालेला आरोपी घरच्यांना भेटायला आल्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही घटना कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी युसुफ वजीर शेख ( वय २३, आश्रनगर, कोंडवा खुर्द ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या राहत्या घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने आरोपीच्या घराच्या आसपास पोलीस सापळा रचून थांबले असताना त्यांना तेथे आरोपी आलेला दिसला.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपणच गुन्हा केला असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पुण्यातील चोरी केलेल्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
आरोपी विरोधात भादवि कलम ३७९ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून ही कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री.रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-०५. श्री विक्रांत देशमुख, मा. सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री शाहुराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. संदिप भोसले, श्री संजय मोगले यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.












