आज सकाळ पासून चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या जवळचा पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे. याआधी देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतरही महाविकास आघाडीला धक्के देणाऱ्या घटना घडल्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रया दिली आहे.
भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. 100 आमदार असले तरी सुद्धा आमच्याकडेचे लोकं त्यांना हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काहीतरी टॅलेंट आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.